in

Break The chain | दोन दिवसांच्या लॉकडाउन बाबत फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये विकेंड लॉकडाऊन सांगत राज्य सरकारने आणि तत्सम जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने उघडण्यास बंदी घातली होती. त्यामुळे, व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर उभे राहून सरकारच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला. तसेच, विकेंड लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, पण 30 एप्रिलपर्यंत दुकानेच उघडायची नाहीत, याला आमचा विरोध असल्याचं व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवीन नियमावली जारी करण्याची मागणी केली आहे.

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावी. तसेच, सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन असल्याचे समजून आम्ही सहमती दर्शवली होती. मात्र, इतरही 5 दिवस लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीचे कडक निर्बंध असल्याने जनमानसात कमालीची अस्वस्था आहे. त्यामुळे या निर्बंधाची नव्याने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

आज राज्यभर व्यापारी राज्य सरकार व प्रशासनाच्या निषेध व्यक्त करणाऱ्या फलकांसह रस्त्यावर घोषणाबाजी केली. यावेळी अनेक व्यापारी वर्गाने गर्दी करत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘राज्यमंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करा’

शिवसेनेला धक्का; माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश