in

बॉयफ्रेंड बर्थ डे सरप्राईज देत नव्हता म्हणून हिने दिली बॉयफ्रेंडला धमकी

वाढदिवस म्हटलं की सर्वच जण खूप उत्सुक असतात. अशातच एक गर्लफ्रेंड आपल्या प्रियकरावर रुसून बसली आहे. सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ वायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सोशल मिडीयावर धुमाखूळ घातला आहे.

या व्हिडीओमध्ये बॉयफ्रेंडने दर बर्थ डेच्यावेळी काहीतरी हटके करावं असं वाटक असतं. एका गर्लफ्रेंडनेही अशीच मागणी केली आहे. मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यास ती काय करेल याची धमकीच तिनं दिलीय.

व्हिडीओत फक्त तरुणीचा चेहरा दिसतो आहे. तिचा बॉयफ्रेंड तिच्यासमोर बसला आहे, त्याचा चेहरा दिसत नाही पण त्याचा आवाज ऐकू येतो आहे. तरुणी उदास देते आहे. तिचा चेहरा रडवेला झाला आहे. आपल्या बॉयफ्रेंडने आतापर्यंत आपल्या बर्थडेसाठी काहीच खास केलं नाही, याचं दुःख तिला आहे. आधीच्या बर्थडे प्लॅनिंगचा सर्व राग ती त्याच्यावर काढते. बॉयफ्रेंड तिला काय करू असं विचारतो. तेसुद्धा ती सांगत नाही, म्हणजे सर्व मीच सांगायचं का? मी तुझ्या बर्थडेसाठी जे काही करते ते तुला विचारून करते का? असंच ती त्याला विचारते.

बराच वेळ त्यांचा असा वाद सुरू असतो. शेवटी ती बॉयफ्रेंडला धमकी देते. या बर्थडेला तून काही प्लॅन केलं नाहीस तर मी केक कापणार नाही. केक तुझ्या तोंडावरच फेकणार. @ximpatientwolf ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटीझन्सना या तरुणीचे वागणे खटकले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट ‘कू’ सर्वाधिक ट्रेंडिंग, युजर संख्या १ कोटींच्या पार

shilpa shetty | “मी चूक केली पण ते ठीक आहे.” शिल्पा शेट्टीचे सुचक विधान