in

‘BoycottNetflix’ होतय ट्रेन्ड; ‘या’ सिनेमामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

Share

या लॉकडाऊनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचं एक उत्तम साधन म्हणून उभारून आलं. या ओटीटी प्लॅटफॉ्रमची रिच पाहता अनेक नवीन कॉन्टेन्ट मग ते सिनेमे असो किंवा वेब सिरीझ रिलीज होताना दिसले. यामध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम यांची एक वेगळीच चलती होती असं दिसलं. पण आता यातील एक डिजिटल जाएन्ट नेटफ्लिक्ससमोर एक वेगळीच अडचण निर्माण झाली असून सध्या ट्विटरवर BoycottNetflix हा हॅशटॅग ट्रेन्ड होतो आहे. हा वाद नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झालेला सिनेमा कृष्णा अॅण्ड हिज लीला याभवती पेटला आहे. हा सिनेमा 25 जून रोजी नेटफ्लिक्सवर भेटीला आला आणि काही दिवसातंच त्याभवती एक मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. या सिनेमात मुख्य पात्राचं नाव कृष्णा असून त्याच्या एका प्रेयसीचं नाव राधा दाखवलं गेलं आह. तसंच या कृष्णाचे अनेक मुलींसोबत प्रेमसंबंध दाखवले गेले आहेत. या सगळ्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सिनेमावर केला जात आहे.

सध्या नेटिझन्सने हा विषय भलताच उचलून धरला आहे आणि अनेक जण ट्विटरवर नेटफ्लिक्स बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. या सिनेमात हिंदू धर्मातील देवांची नावं वापरत त्यांच्याबद्दल असं सिनेमात दाखवल्यामुळे हिंदू धर्माचा अपमान झाला आहे म्हणूनंच या सिनेमावर बंदी आणावी तसंच हिंदूंची माफी देखील मागावी असं म्हणत अनेक ट्विट सध्या होताना दिसत आहेत. सध्या यावर बरंच भाष्य ऑनलाईन होताना दिसत असलं तरी नेटफल्िक्सकडून यावर अद्यापतरी प्रतिक्रिया आलेली नाही आहे.

कृष्णा अॅण्ड हिज लीला या सिनेमात एका साधारण दिसणाऱ्या तरूण कृष्णाची कथा दर्शविली गेली आहे. तो साधारण दिसत असला तरी त्यांच्या बोलण्यातून तो अनेक मुलींना सहज आपल्या प्रेमात पाडताना दिसतो. त्यातंच त्याचं एकाच वेळी तीन मुलींसोबत नातं असल्याचं दाखवलं गेलं आहे. या तीन मुलींमध्ये एकीचं नाव राधा असं देखील दाखवलं गेलं आहे. हा सिनेमा तेलगू भाषेत असून सध्या नेटफ्लिक्सनवर टॉप टेन सिनेमांमध्ये झळकतो.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Video…जेव्हा कोरोनाच्या संकटात वारीला निघालेल्या वारकऱ्याला ‘वर्दीतला विठ्ठल’ भेटतो!

विठुराया दिसला मला पीपीई किट घातलेला…अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची वारीवर भावनिक कविता