in

‘The Ultimate Test Series’ म्हणून बॉर्डर-गावस्कर कसोटीची निवड

आयसीसीने ‘The Ultimate Test Series’असा नवा सन्मान देत बॉर्डर-गावस्कर कसोटीला दिला आहे. 16 अप्रतिम कसोटी मालिकांमधून या कसोटीची निवड झाली आहे. ही कसोटी मालिका कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली नवख्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकून दाखवली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेची आयसीसीने ‘The Ultimate Test Series’ म्हणून निवड केली आहे. ऑनलाइन मतदान प्रक्रियेच्या आधारे ही निवड करण्यात आली. भारतीय संघातील नवख्या खेळाडूंनी मिळवून दिलेल्या ऐतिहासिक विजयाला जगाने देखील मान्य केल्याचे यातून दिसून येत आहे. 2020 च्या अखेरीस सुरु झालेली ही मालिका 2021 च्या सुरुवातीपर्यंत चालली ज्यात रोमहर्षक सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

ऐतिहासिक विजय

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ज्यात पहिल्या सामन्यात भारताला लजास्पद पराभव पत्करावा लागला. ज्यात भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर समेटला होता. 8 विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने कमबॅक करत 8 विकेट्सने विजय मिळवला. नंतर ऋषभ पंतच्या 97 धावांच्या जोरावर तिसरी मॅच ड्रॉ करण्यात भारत यशस्वी ठरला. अखेर चौथ्या आणि निर्णायक कसोटीत गाबाच्या मैदानात विजयासाठीच्या 328 धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलच्या 91 धावांच्या सुरुवातीवर पंतने अखेर नाबाद 89 धावा करत विजय भारताच्या नावे केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्रींची पंतप्रधानांसोबतची भेट वैयक्तिक, राजकीय करण्याचं कारण नाही

Maharashtra Corona: महाराष्ट्रात 10 हजार 891 कोरोनाबाधित; रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर