कोरोना लसीकरणाचा टप्पा सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीत अधिक लोकांना लस देणं ही प्राथमिकता आहे. याच पार्श्वभूमीवर मरीन लाईन्स येथील बॉम्बे हॉस्पिटलनं बीएमसीकडे विनंती केली. रात्री १० वाजेपर्यंत कोरोना लसीकरण करू द्यावं. यासाठी बीएमसीनं परवानगी द्यावी, अशी मागणी रुग्णालयानं केली आहे. संध्याकाळी ६ वाजेनंतर को-विन अॅपवर नोंदणी करण्यास बंधनं आहेत. त्यामुळे या विनंतीचा विचार होणं महत्त्वाचं असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे.
‘आम्ही रात्री १० वाजेपर्यंत कोरोना लसीकरण करू शकतो. यामुळे कार्यालयीन कामकाज संपवून अनेक जण लस घेऊ शकतात. बीएमसी प्रमुखांनी याला मान्यता दिली आहे’, अशी माहिती बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साली यांनी दिली आहे.
मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. कोविन अॅपमधील बंधनांमुळे अनेक अडचणी येत आहेत. यामुळे अधिक लोकांचं लसीकरण होण्यास अडचणी येत आहेत. संध्याकाळी ६ नंतर अॅप बंद झाल्यानंतर लस घेणाऱ्यांचे तपशील तपासता येत नाहीत. जर दोन शिफ्टमध्ये लसीकरण सुरू केलं तर अधिकाधिक लोकांपर्यंत लस पोहोचेल, असे काकाणी म्हणाले.
Comments
Loading…