in

बॉलिवूड विरुद्ध न्यूज चॅनल्स; रिपब्लिक टीव्ही,टाइम्स नाऊविरोधात याचिका

Share

सुशांत सिंग राजपूत प्रकरण बरच चिघळल्या नंतर मौन बाळगलेलं बॉलीवूड आता अॅक्शनमोडमध्ये आली आहे. बॉलिवूडमधील 4 प्रमुख संघटना आणि 34 निर्मिती संस्थांनी एकत्रित येत माध्यमातील काही चॅनल्स विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३4 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे. यामध्ये गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचं काम या सगळ्यांनी केल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात या प्रॉडक्शन हाऊसेसनी बेजबाबदार बातमीदारीचा ठपका ठेवला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पायल तडवी आत्महत्या प्रकरण; कुटुंबीयांचे नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन

मुंबईच्या Power Cut प्रकरणाची चौकशी होणार-उद्धव ठाकरे