in

बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण : सुशांतसिंह राजपूतला थेट ड्रग पुरविणारा माफिया NCBच्या ताब्यात

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या की हत्या हे अद्याप जाहीर झालेले नसले तरी देखील नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (एनसीबी)ला मोठे यश मिळाले आहे. सुशांतसिंह राजपूतला थेट ड्रग्ज पुरविणारा माफिया एनसीबीच्या ताब्यात आला आहे. गोव्यात एनसीबीची मोठी कारवाई सुरु आहे.

या प्रकरणी गोव्यामध्ये एनसीबीने छापे मारायला सुरुवात केली आहे. गोव्यातील काही ठिकाणी एनसीबीने छापे टाकले असून काही ड्रग्ज पेडलरना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. गोव्यातील कारवाईत एनसीबीच्या हाती सुशांत राजपूतला ड्रग्ज पुरविणारा माफियादेखील लागला आहे. एनसीबीने तीन जणांना अटक केली आहे, अशी माहिती एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (NCB)ने शुक्रवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या दोषारोप पत्रात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे त्याच बरोबर ३३ आरोपींची नावे नमूद करण्यात आली. एनसीबीचे मुख्य समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Lockdown | मुंबईत लवकरच अशंतः लॉकडाउन लागू शकतो?

बजरंग ठरला जगातील अव्वल कुस्तीपटू