आजकाल प्राप्तिकर विभागाचे छापे पडण्याचे वृत्त सर्रस ऐकायला मिळतात. त्यात बॉलीवूड कलाकारचे प्रमाण जास्त आहे. नुकतेच आयकर चोरी केल्या प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यप अभिनेत्री तापसी पन्नूवर, चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटे यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले आहेत. पाहूयात आता पर्यंत कोणत्या बॉलीवूड कलाकारांना प्राप्तिकर विभागाने टार्गेट केले आहे.
एकता कपूर : शूट आउट एट वडाला या प्रसिद्ध चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी एकता कपूर हिच्या घर आणि बालाजी फिल्म्स स्टुडीओवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले होते. १०० पेक्षाअधिक अधिकारी या कार्यवाहीत सामील होते.

कटरीना कैफ : २०११ साली बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ हिच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले होते. तिच्या घरामध्ये काळा पैसा असल्याच्या संशयावरून हा छापा मारण्यात आला होता.

प्रियांका चोप्रा : देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले होते. प्रियांकाच्या घरात 7.5 करोड रुपये असल्याच्या वृत्त समोर आले होते.

सोनू सूद : कोरोना काळामध्ये सर्व मजुरांना स्वतः खर्च करून त्याच्या घरी पोहचवणारा देवदूत म्हणजे सोनू सूद, हा अभिनेता देखील प्राप्तिकर विभागाच्या नजरेतून चुकला नाही. सोनू सूदने 30 करोडची संपत्ती खरेदी केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाही करण्यात आली होती.

संजय दत्त : संजय दत्त हे नाव वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्याच्या घरात २५० करोड रुपये असल्याच्या वृत्त समोर आले होते.

राणी मुखर्जी : २००० साली राणी मुखर्जी यशाच्या शिखरावर असताना तिच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले होते. या छाप्यामध्ये तिच्या घरातून 12 लाखाची रक्कम मिळाली होती.

सोनू निगम : अलिशान गाड्यांचा शोक असणाऱ्या गायक सोनू निगमच्या घरावर देखील मागील डिसेंबरमध्ये प्राप्तिकर विभागाचे छापे पडले होते.

Comments
Loading…