कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिकेनं तातडीनं पावलं उचलली असून, नियम व आदेशाचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. शनिवारी रात्री महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘चुकीला माफी नाही’म्हणत प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धडक कारवाई केली.
वांद्रे पश्चिम परिसरातील आयरिश हाऊस पाली हिल, खार येथील यू टर्न स्पोटर्स बार आणि कर्तार पिल्लर बार अॅण्ड रेस्टॉरंट या तिन्ही रेस्टॉरंट व क्लबची पाहणी केली. यावेळी कोविड संदर्भात महापालिकेने ठरवून दिलेले नियम मोडले जात असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आलं. बांद्रा वेस्ट बारमध्येही १०० पेक्षा अधिक लोक विनामास्क असल्याचं आढळून आलं.
महापालिकेनं आयरिश हाऊसकडून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० हजार, यू टर्न स्पोर्टस बारला २० हजार कर्तार पिल्लर बार अॅण्ड रेस्टॉरंटला ३० हजार, तर बांद्रा वेस्ट बारला ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
Comments
Loading…