in

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडविण्याचा भाजयुमोचा प्रयत्न

लोकशाही न्यूज नेटवर्क

वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गा़डी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांचा ताफा न थांबता निघाल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.

लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. मात्र असे असतानाही नागरिकांना वाढीव वीज बील देण्यात आले आहे. या वाढीव वीजबिलावरून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाने शुक्रवारी राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने केली होती. अजित पवार हे अमरावतीवरून नागपूरला बैठकीसाठी जात होते. वाटेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांना भेटून निवेदन द्यायचे होते. नागपूरजवळील वाडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी, चार जणांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘पायगुण..?’ अमित शाहांची पाठ फिरताच सिंधुदुर्गात भाजपाच्या सात नगरसेवकांचे राजीनामे

10वी- 12वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र 3 KM च्या परिसरातच