in

भाजपच्या ‘या’ महिला आमदाराला कोरोनाची लागण

Share

नाशिकमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यात आता नाशिक मध्य मतदारसंघाच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. देवयानी यांनी स्वत;हून याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली.

मी चार ते पाच वेळा कोरोनाची तपासणी केली रिपोर्ट निगेटिव्ह आला. आज मुंबई अधिवेशन व जळगाव येथे प्रवास केल्यामुळे…

Posted by Devyani Pharande on Sunday, 13 September 2020

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नुकतीच अँटिजेन टेस्ट केली. या टेस्टमध्ये फरांदे यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. फेसबुकवर देखिल याबाबत त्यांनी पोस्ट करत मुंबई अधिवेशन तसेच जळगाव येथे प्रवास केल्याने खबरदारी म्हणून टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली असल्याची माहिती दिली. यावेळी देवयांनी यांनी माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असं आवाहन केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

दिवाळीनंतर नववी ते बारावीसाठी शाळा सुरू

पंतप्रधान मोदी यांचे कोरोना संदर्भात जनतेला आवाहन…