सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा पराभव करत भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिचून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपने झेंडा फडकल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर दिली.
भाजपच्या संजना सांवत यांनी शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 अशा फरकाने पराभव केला आहे. भाजपचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार नितेश राणे यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. यावेळी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान या विजयावर भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला. गल्लीत बसून भुंकणारे शिवसेनेचे आमदार, खासदार यांच्या नाकावर टीचून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्हा परिषद अध्यक्ष पदी संजना सावंत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन त्यांनी केली.
Comments
Loading…