in

भाजपाचा आयटी सेल दक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ट्विटर हॅण्डल सुस्तावलेले!

भाजपा कायम सोशल मीडिया कायम अॅक्टिव्ह असतो. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी या आयटी सेलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता राज्यात देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा आयटी सेल जास्त सक्रिय असल्याचे दिसते.

राज्यात सध्या राजकीय वादळ उठले असून त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. त्याचा सर्व तपशील भाजपाच्या आयटी सेलने लागलीच ट्विट केला आहे.

तर, दुसरीकडे राज्यात एवढ्या सर्व घडामोडी घडत असताना देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आयटी सेल सुस्तावलेलाच दिसतो. प्रदेश काँग्रेसचे ट्विटर हँडलवरील शेवटची पोस्ट 20 तासांपूर्वीची आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची पोस्ट दोन तासांपूर्वीची आहे. मात्र, ती सुद्धा पिंपरी-चिंचवडच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची पोस्ट आहे!

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संसदेत Sex… ऑस्ट्रेलियाच्या प्रेयर रुम्समधील अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ व्हायरल!

TRP Scam | अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना आदेश