आमचं ठरलं आहे. किंबहूना आम्ही निर्णय घेतला आहे. ज्या शहरात ज्या पालिकेत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे. तिथे त्या पक्षाने नेतृत्व करावं. इतरांनी त्यांच्या नेतृत्वात लढावं. हा आमचा फॉर्म्युला आहे. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
यापूर्वी राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबत सत्तेत असला तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे येथे स्वबळावर निवडणुका लढण्याचा विचार आम्ही का करू नये?, असा सवाल करत मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी आपला स्वबळाचा निर्धार कायम ठेवला आहे. मात्र आता संजय राऊत यांनी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. शिवसेनाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याने या पालिका निवडणुकीत शिवसेना नेतृत्व करेल. आघाडीतील इतर पक्ष शिवसेनेसोबत येतील. असं राऊत म्हणाले.
आमच्यात खेचाखेची नाही
एकत्र निवडणुका लढल्यामुळे काय होतं हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे आणि मानसिकताही एकत्र राहण्याची आहे. आमच्यात कोणतीही खेचाखेची नाही. महाराष्ट्रातील सत्ता आम्ही पाच वर्ष पूर्ण करू. तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकत्र राहून सत्तेचं वाटप करू, असं ते म्हणाले
Comments
Loading…