in ,

औरंगाबाद क्रिडा विद्यापीठासाठी भाजपचे आंदोलन

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ झालेच पाहिजे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार आंदोलन केले. पुण्यात मोठ्या प्रमाणात क्रीडा सुविधा असताना औरंगाबादेत मंजूर करण्यात आलेले क्रीडा विद्यापीठ पुण्यात घेऊन जाणे हा मराठवाड्यावरील अन्याय आहे, असे म्हणत संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.प्रचंड घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. मराठवाड्यावर अन्याय होत शिवसेना आमदार गप्प का असा सवालही आंदोलनकर्त्यांनी केला.

शहरापासून १२ किलोमीटरवर असलेल्या करोडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती.ही घोषणा खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर शासकीय पातळीवर जागेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. करोडी येथे १२० एकर जागा निश्चितही करण्यात आली होती.ही जागा गेल्या वर्षी क्रीडा विभागाकडे देण्यात आली होती.मराठवाड्याबाबत फारशी आस्था नसलेल्या महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवले, असा आरोप करत आंदोलनकांनी राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

शहराध्यक्ष संजय केणेकर, आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहर सरचिटणीस राजेश मेहता, जालिंदर शेंडगे, मनीषा भन्साली, बबन नरवडे, अमृता पालोदकर, हाजी दौलत खान पठाण, क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे आदी उपस्थित होते.

“क्रिडा विद्यापीठ येथे निर्माण झाले तर, ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. शारीरिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नताही क्रीडा विद्यापीठाकडे करता येईल, क्रीडा विद्यापीठ त्वरित सुरू करा”, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केली. दरम्यान, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणाऱ्या त्रिकुटाला अटक

”आम्हाला न्याय द्या,निर्बंध शिथिल करा”; कल्याणमध्ये हॉटेल व्यावसायिक आक्रमक