in

भविष्यात भाजपा हा पक्षच उरणार नाही, नाना पटोलेंचे फडणवीसांवर टीकास्त्र

लोकशाही न्यूज नेटवर्क | राज्यात ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली असतानाचं भविष्यात भाजपा हा पक्षच राहणार नाही,असं टीकास्त्र माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर डागलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमी नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी बाकांवर आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल,” असं फडणवीस यांनी म्हटले होते.

या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले,”देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजपा हा पक्षच उरणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अमित शहांवरही हल्लाबोल

सिंधुदुर्गमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासान दिलं नव्हतं असे विधान केले होते. या विधानावर नाना पटोले म्हणाले, “भाजपा आणि शिवसेनेत‌ काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?,” असा सवाल पटोले यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Local | मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी!

विद्रोही साहित्य संमेलानाचे पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला निमंत्रण?