एकीकडे इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर, दुसरीकडे वीजपुरवठा तसेच वीजबिलांसदर्भातील मागण्या 24 फेब्रुवारीपर्यंत मान्य न झाल्यास राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद झाली. 100 युनिटपर्यंत वीज मोफत द्या, लॉकडाऊन काळातील अवाजवी बिले दुरुस्त करून द्या यासह इतर मागण्या आघाडी सरकारने मान्य न केल्यास 24 फेब्रुवारी रोजी राज्यभरात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात थकबाकी वसुलीसाठी 45 लाख कृषी ग्राहकांपैकी एकाही शेतकऱ्याचा वीजपुरवठा तोडला गेला नाही. आघाडी सरकारला हे का जमू नये? असा सवाल करून, थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा तोडण्याचा आदेश मागे घ्या, अशी मागणी त्यांनी केली. विद्युत शुल्काच्या माध्यमातून राज्य सरकारकडे दरवर्षी 9 हजार 500 कोटी रुपये एवढा महसूल जमा होतो. हा महसूल वीजबिल माफीसाठी उपयोगात आणावा. तसेच, उर्वरित रकमेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करावी, असे ते म्हणाले,
Comments
Loading…