in

‘महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!’ ट्विटरप्रकरणावरून भाजपाचा राज्य सरकारवर निशाणा

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता राजकारण रंगू लागले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येऊ लागताच, भारतीय सेलिब्रिटिंनी सरकारच्या बाजूने ट्विट केले आहे. राज्यातील ठाकरे सरकारकडून याची चौकशी करण्यात येणार आहे. यावरून भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

अनेक सेलिब्रिटिंनी केलेले ट्विट सारखेच असल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणून दिले. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ‘महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!’ असल्याची खोचक टीका भाजपाने केली आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!’ असे त्यांनी म्हटले आहे.

योग्यता लक्षात घेऊन बोलत जा

आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँपस्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या ट्विटची चौकशी करणार आहे. अनिल देशमुखांना कोरोना झाला आहे. त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्मविभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Teach Update : Google लवकरच करणार ‘ही’ सर्विस बंद

CA परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल