in ,

देवाच्या नावाने पैसा गोळा करणारी भाजपा बेशरम…

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू होती. यात अनेक नाव आघाडीवर होती. अखेर प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी नाना पटोले यांनी लोकशाही न्यूज चॅनेल बरोबर बातचीत करताना, भाजपाचे बेशरम लोक आहेत, देवाचा नावाने पैसा गोळा करतात, भगवान श्री रामांनी भाजपाला काय टोलवसूलची कामे दिली आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी भाजपाला केला आहे.

भाजप देवाला पण सोडत नाही. श्री राम मंदिराच्या नावाखाली पैसे गोळा करत आहेत. मागील वर्षात १४०० कोटी रुपये जमा केले होते त्या पैशांचा अजून हिशोब दिला नाही. गावामध्ये देवाचा सप्ताह होतो ,सकाळी सप्ताह संपल्यानंतर रात्री हिशोब द्यावा लागतो. भाजपा तर एवढे बेशरम लोक आहेत की जनतेच्या घामाचे पैसे घेऊन जात आहे. भगवान श्री रामांनी भाजपाला काय टोलवसूलची कामे दिली आहेत का?

भाजप वीजबिल माफीच आंदोलन, राम मंदिर भाजपवर सडकून टीका
भाजपच अस आहे की खोटं बोला रेटून बोला. ते देवालाही सोडत नाही. रामाच्या नावाने पैसे ते गोळा करत आहेत. त्यांना प्रमाणपत्र मिळालं आहे का ? भगवान रामाने यांना टोल वसुलीच काम दिलं आहे का ? फडणवीस यांनी वीजबिल माफीची घोषणा केली होती ते त्यांना केलं का ? त्यांचे मगरमच्छ के आसू. डिझेल पेट्रोलच्या विरोधात करा ना आंदोलन या. तस केलं तर मोदी त्यांना नोकरीवरून काढेल. पदवीधर निवडणुकीत सुद्धा लोकांनी त्यांना पराभूत केला आहे अशी सडकून टीका नाना पटोले यांनी भाजपावर केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुठून येतो एवढा confidence? कंगनाचा ट्विटरला बॅन करायचा इशारा

IND vs ENG | पहिला दिवशी कर्णधार रूटचे दमदार शतक