in

…तशी नाचक्की ना? अतुल भातखळकर यांचा काँग्रेसवर पलटवार

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. यावरून भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आणीबाणीपासून बोफोर्स तोफा प्रकरणापर्यंतचा उल्लेख करत तशी नाचक्की ना? असा सवाल भाजपाने केला आहे.

आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे. दिल्लीत प्रवेश करू नये, म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

याबाबत ट्विट करत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रसेवर पलटवार केला आहे. जी नाचक्की 19 महिने लादलेल्या आणीबाणीमुळे, सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारमुळे, दिल्ली दंगलीत ठार मारलेल्या हजारो शिखांमुळे, बोफोर्स तोफ खरेदीत खाल्लेल्या कमिशनमुळे झाली नाही, तशी नाचक्की ना?, असा उपरोधिक सवाल भातखळकर यांनी केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कृष्णा हेगडे यांचा भाजपला रामराम, या पक्षात प्रवेश…

भाजपाचा ‘व्हिप’ जारी… राज्यसभेत मोठ्या घडामोडींचे संकेत