in

भाजपाचा ‘व्हिप’ जारी… राज्यसभेत मोठ्या घडामोडींचे संकेत

लोकशाही न्यूज नेटवर्क

मागील आठ दिवसांपासून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यंदा कृषी धोरणांप्रमाणेच अन्य मुद्द्यांवर उहापोह होण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाने राज्यसभेतील सर्व सदस्यांना व्हिप बजावला आहे. खासदारांनी राज्यसभेत पूर्ण संख्येने उपस्थित राहावं, आणि सरकारच्या भूमिकेचं समर्थन करावं, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणती विधेयके चर्चेस येणार, याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

यंदा अधिवेशनात महत्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ८ तारखेपासून १२ फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेत सर्व खासदारांनी उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावण्यात आला आहे. भाजपकडे लोकसभेसह राज्यसभेतही बहुमत आहे. मात्र ऐनवेळी गैरहजेरीमुळे कोणतेही विधेयक पास करण्यास अडचणी येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पक्षाने राज्यसभेतील खासदारांना अधिकृत व्हिप जारी केल्याने ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान काही महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते.

राज्यसभेत कृषी विधेयकावरून गदारोळ

राज्यसभेत रविवारी कृषी विधेयकांच्या चर्चेवरून गोंधळ झाला. विरोधकांनी आक्रमक होत कामकाज बंद पाडलं, माईक तोडला, काही कागदपत्रे फाडली. यानंतरच विरोधकांनी उपसभापतींवर अविश्वास ठराव आणला. तर गदारोळ करणाऱ्या सदस्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे आता ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान नक्की काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तशी नाचक्की ना? अतुल भातखळकर यांचा काँग्रेसवर पलटवार

आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी 1097 खेळाडूंची नोंदणी, 18 तारखेला लिलाव