in

पश्चिम बंगालमधील भाजपच्या रथयात्रेची सुनावणी ५ फेब्रुवारीला कलकत्ता उच्च न्यायालयात होणार

लोकशाही न्यूज नेटवर्क
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचे लवकरच बिगुल वाजणार आहे, आणि सर्वच पक्षांनी आपल्याबाजूने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने रथयात्रेचे नियोजन आहे. या रथयात्रेसाठी ममता बॅनर्जी सरकारकडे परवानगी मागितली गेली आहे. परंतु अशातच भाजपाची रथयात्रा थांबविण्याच्या मागणीसाठी ३ फेब्रुवारी रोजी कलकत्ता उच्च न्यायालयात अ‍ॅड रमाशंकर प्रसाद यांनी जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

ही रथयात्रा पाच ब्लॉकमध्ये असणार असून राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांतून जातील. भाजपने १ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्य सचिव अलपान बंडोपाध्याय यांना पत्र लिहून रथ यात्रेविषयी माहिती दिली होती. यासाठी ममता बॅनर्जी सरकारकडे परवानगी मागितली गेली आहे, परंतु राज्य सरकारने पक्षाला यासाठी स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. भाजपाची अडचण येथेच संपली नाही.

उच्च न्यायालयात रथयात्रा रोखण्यासाठी याचिका
पश्चिम बंगालमधील भाजपाची प्रस्तावित रथयात्रा थांबविण्यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली गेली. या रथयात्रेचा कोरोनाच्या काळात राज्यात आणि कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे याचिकेत म्हटले आहे. त्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होऊ शकते, असे याचिकाकर्ते अ‍ॅड रमाशंकर प्रसाद यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष? लवकरच घोषणा

शेतकऱ्यांना 10 एकरात 100 कोटीची वांगी लावण्याचा मंत्र द्या; भाजपाचा सुप्रिया सुळेंना सल्ला