in

भाजपाचं रेलभरो आंदोलन… विरोधी पक्षाला २६० रुपयांच्या दंड

कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपाच्यावतीने राज्य सरकार विरोधात चर्चगेट रेल्वे स्थानकासमोर रेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. तसेच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी  चर्नी  रोड विनातिकीट लोकलने प्रवास केला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडून २६० रुपयांच्या दंड आकाराला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद करण्यात आलेली लोकल रुळावर धावू लागल्यानंतरही सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे सर्व सामान्य मुंबईकरांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा सुरू करावी, यामागणीसाठी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चर्चगेट स्थानकाबाहेर आज रेलभरो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शेकडो भाजप कार्यकर्तेसह आमदार मंगलप्रभात लोढा आमदार राहुल नार्वेकर उपस्थितीत होते. मात्र, स्थानकांवर जात असताना पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची अडवणूक केली.  त्यांची धरपकडकरत पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना  ताब्यात घेतले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo Olympic 2020 | बजरंग पुनिया पराभूत… कांस्य पदकासाठी लढणार

रिंकू राजगुरुच्या ‘या’ नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!