in

Milk Agitation;दूध दरासाठी शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन

Share

दुधाला राज्यातील ठाकरे सरकारने दर वाढवून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांनी केले. या आंदोलनाची सुरुवात चंद्रभागा नदीला दुग्धाभिषेक करुन झाली. आंदोलनाचे नेतृत्व महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांनी केले.

भाजपा, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. दुधाला प्रति लिटर दहा रुपये जादा भाव देण्यात यावा, दूध भुकटीला किमान ५० रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, संगमनेर, अहमदनगर, नाशिक, पंढरपूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, अमरावती, अकोला, नांदेडसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले.

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले, तर काही ठिकाणी दुधाचे टँकर अडवण्यात आले. देवाला दुग्धाभिषेक करुन तसेच दूध नदीत ओतून शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा जाहीर निषेध केला.

राजधानी मुंबईत गोरेगाव येथे महानंद डेअरी समोर भाजपाने आंदोलन केले. तर पंढरपूरमध्ये महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली चंद्रभागा नदीला दुग्धाभिषेक करुन आंदोलन करण्यात आले.

पंढरपूर सातारा रस्त्यावर आणि पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून दूध घेऊन जाणारी वाहने अडवली. सांगली जिल्ह्यातील आष्टा भिलवडी रस्त्यावरही दूध घेऊन जाणारी वाहने अडवण्यात आली. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासमोर पिंपरी चिंचवड येथे मोठे आंदोलन करण्यात आले. मरावतीत दुधाच्या गाड्या अडवून सरकारविरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. अकोल्यात डाबकी रोड, सरकारी बगीचा, खडकी येथे आंदोलन झाले. दुधाला भाव मिळण्यासाठी भारतीय किसान संघटनेकडून आंदोलन केले.

भाजपा दुधाच्या मुद्यावर राजकारण करतंय – रोहित पवार

दूध दराच्या प्रश्नावर भाजपा राजकारण करत आहे. हा प्रश्न लवकरच सोडवला जातोय, त्यासाठी दोन-तीन बैठका देखील झाल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी आंदोलन जाहीर केले आहे. भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये. केंद्र सरकारने राज्यामध्ये १५ हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजपा काहीच बोलत नसून इंधन दरवाढीबद्दल भाजापा का शांत आहे. भाजपने याविरोधात आंदोलन करावे, असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय…

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

The population of Pune has increased, the water level has decreased, the water resources department is in dispute

पुण्याची लोकसंख्या वाढली, पाणी पातळी घटली, जलसंपदा विभाग रंगलाय वादात

कोरोना काळातला सर्वात मोठा भ्रष्टाचार उघड