राज्य सरकरकडून गृहनिर्माण सोसायट्यांकडून अकृषिक कर (एनए टॅक्स) आकारण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात भाजपा आक्रमक झाली असून आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वाखाली आज निदर्शने करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारने 2006 पासून स्थगित असलेल्या मुंबई उपनगरांमधील अकृषिक कराची वसुली करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विविध शहरांमधील गृहनिर्माण संस्थांकडे सन 2000 पासूनच्या अकृषिक कराची पूर्वलक्ष्यी प्रभावाने मागणी करण्यात येत आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना तशा नोटिसाही पाठवल्या आहेत. हा ब्रिटिशकालीन कर असून तो बंद करण्यात यावा, अशी भाजपाची मागणी आहे.
पुण्यासह याबाबतच्या नोटिसा सोसायटय़ांना महसूल विभागाकडून देण्यास सुरुवात झाली आहया निर्णयामुळे सरकारी तिजोरीत मोठी भर पडणार असली, तरी नागरिकांना याची झळ बसणार आहे. त्यामुळेच याला भाजपाने विरोध केला आहे. त्याचबरोबर एसआरएतील घरांची 10 वर्षाच्या आत खरेदी-विक्री केल्यास 48 तासांत घरातूनबाहेर काढण्याचा नियम करण्यात आला आहे, त्यालाही भाजपाने विरोध केला आहे. हे दोन्ही जाचक कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. परंतु वेळ न दिल्यामुळे सह्याद्री अतिथीगृहासमोर निदर्शने केली, असे अतुल भातखळकर म्हणाले.
Comments
Loading…