in

शिवसेना भवनासमोर भाजपाचे आंदोलन..दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

मुंबई भाजपा युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा फटकार मोर्चा काढण्यात आलाय. शेकडो भाजपा कार्यकर्ते सेना भवन परिसरात दाखल झाले आहेत. त्यातच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांसोबत या ठिकाणी पोहोचल्याने आणखी तणाव वाढल्याचे चित्र आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भाजपाने राम मंदिरासाठी आलेल्या वर्गणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सेना भवनावरच मोर्चा काढला.

“भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली,” अशी माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती असा आरोपही केला आहे. सदा सरवणकर यांनी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण झालेली नसून माझ्या निदर्शनास आलेलं नाही सांगत आरोप फेटाळले आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“लस घ्या आणि मिळवा पेट्रोल मोफत” अनोख्या जाहीरातीमुळे लांबच लांब रांगा

ख्रिस्तियानो रोनाल्डोची एका कृतीने, कोका-कोला कंपनीचे मोठे नुकसान