in

ऊर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर भाजप खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या…

Share

कॉंग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. या प्रवेशावर आता राजकारणात चहुबाजुंनी प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेसकडून नशीब आजमावल्यावर त्यांना अपयश आले होते. आता बघू त्यांचे नशीब बदलते की शिवसेनेचे नशीब बदलते? असे प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

जालन्यामध्ये प्रीतम मुंडे यांची पत्रकार परिषद पार पाडली. यावेळी प्रीतम मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. कुठल्याच बाबतीत हे सरकार चांगले काम करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती असल्याचा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला. त्यामुळे लवकरच सरकार जिथून आले तिथे परत जाणार आहे, असे भाकीत प्रीतम मुंडे यांनी वर्तवले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालीय,महिला सुरक्षेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होतोय, कोरोनाच्या संकटात उपाययोजना करण्याच्या बाबतीत देखील सरकार निष्क्रिय ठरले आहे, असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पवईत म्हाडा इमारतीला लागली भीषण आग

…जेव्हा बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण करतो नंदुरबार जिल्हाधिकाऱ्याच्या कार्याचे कौतुक