in

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Share

कमलाकर बिरादार : देश एकीकडे कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने पाऊले टाकण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्त रुग्णांनाच कोरोनाची पुन्हा लागण होण्याचे प्रकार समोर येत आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यावेळी खासदारांची कोरोना टेस्ट करताना अनेक खासदार पॉझिटिव्ह निघाले. पण नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह निघाले आहेत.

या संदर्भात त्यांनी व्हिडीओद्वारे माहिती दिली आहे. या व्हिडीओत ते म्हणतायत, माझा कोरोना अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांशी सल्लामसल्लत केली आहे. पण आपली तब्येत ठणठणीत असल्याचा मेसेजही त्यांनी दिला आहे. तसेच माझ्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये असेही त्यांनी सांगितले आहे.यावरुन आता दुसऱ्यांदा कोरोना होत नाही असा दावा खोटा ठरत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आग्र्यातील मुघल म्युजियमला महाराजांचं नाव

Watch Video;रिषभचे भन्नाट सिक्सर तर अजिंक्यच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण