in

‘ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका; उगाच उद्या इज्जत जावुक नको’

‘ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका; उगाच उद्या इज्जत जावुक नको”
शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार झाल्यानंतर विरोधकांनी अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात भाजपा आमदार नीतेश राणे यांनी कोकणी भाषेत अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी केली. परिवहन खात्यात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नाशिक इथं गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली.

नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनिल परब गोत्यात आले. आमदार नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, ओ परबांनू, मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका. उगाच उद्या इज्जत जावुक नको. आजच उरलीसुरली लाज वाचवा आयकतास ना” असा टोला अनिल परब यांना लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘शरद पवार गॉडफादर, मग ठाकरे सरकारच्या निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच’

विठ्ठल मंदिर पालखी सोहळ्याचा निर्णय सरकार घेणार