in

‘मुख्यमंत्र्यांना देव चांगल्या सद्भावना देवो’; भाजप आमदाराचे खड्ड्यात बसून होमहवन

सुरेश काटे । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कल्याण पूर्वेचे भाजप आमदार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी खड्ड्यात बसून होमहवन करुन उपहासात्मक आंदोलन केले आहे. या आंदोलनाची एकच चर्चा रंगली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळी गावातील मुख्य रस्त्याची गेल्या पाच वर्षापासून दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या डागडुजी संदर्भात  भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र अद्यापही रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून नागरिक अशा खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. हीच बाब लक्षात घेत आमदार गणपत गायकवाड यांनी खड्डेमय रस्ता तसेच मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होम हवन करत उपरोधीक आंदोलन केलं . यावेळी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालक मंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे याचा भूमिकेचा निषेध नोंदवला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाटणमधील शेतीचे नुकसान, अतिवृष्टीनं जमीन खरडली!

Maharashtra Corona । महाराष्ट्रात १२ हजार ६४५ रुग्ण कोरोनामुक्त