in ,

भाजप नेता गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; औषध साठ्याचा आरोप सिद्ध

माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपा नेता गौतम गंभीर याच्या फाऊंडेशनवर कोरोनाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या गोळ्यांचा अवैध पद्धतीने साठा, वाटप आणि वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप आता सिद्ध झाला आहे.दिल्ली उच्च न्यायालयाने याविषयीची माहिती दिली आहे.

गौतम गंभीर फाऊंडेशनने कोरोनावरील फॅबिफ्लू या औषधांचा अवैध साठा, वापर आणि वाटप केल्याचा आरोप होता. हा आरोप आता सिद्ध झाला आहे. भारतीय औषध नियंत्रक मंडळानं न्यायालयासमोर आपला अहवाल सादर केला होता.

दरम्यान नेते करोनाच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांचा अशा प्रकारे साठा आणि वाटप कसं काय करु शकते, असा सवाल उपस्थित करणाऱ्या एका जनहित याचिकेनंतर ही न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona; महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट

Maharashtra Unlock; महाराष्ट्र अनलॉक? सरकारमधील संभ्रमावस्थेवर फडणवीसांसह भाजप नेते कडाडले…