in

भाजपा नेत्याच्या मुलीची निर्घृण हत्या

झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एका १६ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. झाडाला लटकलेल्या अवस्थेत असणारा मृतदेह सापल्यानंतर एकच खळबल उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या करण्याआधी आणि झाडाला लटकवण्याआधी तिचे डोळे बाहेर काढण्यात आले होते. पीडित मुलगी ही स्थानिक भाजपा नेत्याची मुलगी होती. ती दहावीच्या वर्गात होती.

पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलमधील कॉल डेटा रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे २३ वर्षीय प्रदीप कुमार सिंह धुनक याला अटक केली आहे. प्रदीप हा मुख्य संशयित आरोपी असून विवाहित आहे. त्याच्यासोबत इतरही काही जण सहभागी असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

७ जून रोजी सकाळी १० वाजता घर सोडल्यानंतर मुलगी बेपत्ता होती. मुलीच्या कुटुंबाने मंगळवारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिसांकडून शोध सुरु असताना गावकऱ्यांना जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पीडितेचा मृतदेह आढळून आला. हत्या करण्याआधी पीडितेला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर आत्महत्या दर्शवण्यासाठी हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान पीडितेच्या कुटुंबाने आरोपींकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर याबाबत स्पष्ट माहिती मिळेल असं सांगितलं असून आपण सर्व बाजूंनी तपास करत असल्याचं सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिखलदऱ्यात पसरली धुक्याची चादर; 3 दिवसांपासून विदर्भाच्या काश्मीरात पाऊस

‘या’ शहरात 51 इमारती अतिधोकादायक