in

‘आरक्षणाविरोधात भाजपच लोकांना कोर्टात पाठवतोय’

भारतीय जनता पक्षाची विचारधारा आरक्षणविरोधी आहे. त्यांचा एक वेगळा दुतोंडी चेहरा आहे. मंडल आयोगालाही भाजपनं विरोध केला होता. आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधातही भाजप काही लोकांना कोर्टात पाठवत आहे,’ असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

‘मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यावर ओबीसींच्या आरक्षणाला सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते आणि त्यावेळी निर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे होते,’ याची आठवणही नवाब मलिक यांनी करून दिली आहे. ‘ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं नाकारली आहे. मात्र, ओबीसींना इतर आरक्षणासोबत राजकीय आरक्षण राहिले पाहिजे या मताशी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहमत आहे,’ असंही ते म्हणाले.

‘आयोग स्थापन करून ओबीसींची जनगणना झाली पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. शिवाय देशातील ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आलेली आहे. ही जनगणना झाली तर देशात, राज्यात आणि जिल्हानिहाय ओबीसींच्या लोकसंख्येची माहिती मिळू शकते आणि पुढचा निर्णय घेता येऊ शकतो. मात्र आता सर्व कायदेशीर बाबी तपासून उचित निर्णय राज्य सरकार घेईल,’ असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आयपीएल 2021चा दुसरा टप्पा 17 सप्टेंबरपासून रंगणार ?

ठाकरे सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल