in

विनयभंग प्रकरण; भाजपच्या नगरसेवकाला अटक

ठाणे जिल्ह्यात एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर विनयभंग केल्याचा आरोपाखाली भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडमधले भाजपचे नगरसेवक आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाहि दाखल आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता मुरबाडचे भाजप नगरसेवक नितीन तेलवणे याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणा संदर्भात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, महिलेच्या घरात घुसून तिच्यावर विनयभंग केल्याचा आरोपाखाली भाजप नगरसेवक नितीन तेलवणे यांना अटक केल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्यावर 452, 354, 354 अ, 506 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वेबसीरिजचे स्क्रीनिंग गरजेचे – सुप्रीम कोर्ट

बीबीसीवरील लाइव्ह चर्चेत पंतप्रधान मोदी यांच्या आईबद्दल अपशब्द, सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया