in

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, सहानुभूतीचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत त्यांच्या डाव्या पायाला जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ममता सहानुभूतीसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांच्या डाव्या पायाला जखम झाली आहे. त्यांना आता तातडीने कोलकाताच्या व्यूह रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ममता बॅनर्जी खोटं बोलण्यात माहिर आहेत, त्यांना ठाऊक आहे की, आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे त्या सहानुभूतीसाठी प्रयत्न करत आहेत”, असा घणाघात अर्जुन सिंह यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन वाझेंच्या वकिलीसाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांचा टोला

डेलकर प्रकरणाची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करा, सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी