in

पीक विमा भरपाईसाठी रास्तारोको; भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा भरपाईसाठी भाजपने रास्तारोको आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपने विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तसेच शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. या आंदोलना दरम्यान भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये इफको टोकियो कंपनी शेतकऱ्यांचा विमा काढते. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप विमा वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणात आंदोलनही झाली मात्र त्याचा काही फारसा फरक पडला नाही आहे. त्यात आज भाजपने पुसद येथे रास्तारोको आंदोलन केले. विमा कंपनीच्या विरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच; राखी सावंतने केली तुलना

‘कोरोनाविरोधातील लढाईत केंद्र सरकार अपयशी’ मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले