in

Birthday Special: पाहा उर्मिला मातोंडकरचा हटके अंदाज

लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा आज वाढदिवस आहे. उर्मिला सध्या राजकारणामध्ये मोठ्याप्रमाणात सक्रीय आहेत. त्यांच्या वाढदिवसानिम्मित विलेपार्ले येथील शिवसेना शाखा ८४ मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गरजू विद्यार्थांना उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच उर्मिला यांनी त्याच्या चित्रपटातील लाकडी की काठी हे गाणे बोलून लहान मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

विलेपार्ले येथील शिवसेना शाखा ८४ मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बॉलिवूड कारर्किदीबरोबरच तिने राजकारणाची इनिंग देखील सुरू कली आहे. उर्मिला मातोंडकर आज ४७ वा वाढदिवस साजरा करीत आहे. उर्मिलाचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबई येथे झाला होता. उर्मिलाने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरूवात केली. तिने प्रथम ‘मासूम’ चित्रपटात काम केले. त्या चित्रपटातील अभिनयानुळे उर्मिला स्टार झाली होती. उर्मिलाने हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. उर्मिलाला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कर्करोगग्रस्त तरुणीसाठी धावून आलं गाव

आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेल्या पाठिंब्यांशी टिकैत यांना काहीही देणे-घेणे नाही!