लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणू आटोक्यात येत असतानाच बर्ड फ्लूचे नवीन संकट राज्य समोर पुन्हा नव्याने उभे राहिले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पक्षांना नव्याने बर्ड फ्लूची लागण होत आहे. नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार या भागात एकूण 16 पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. आगामी काळात नवापूरमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांना मारण्यात येणार आहे.
बर्ड फ्लूमुळे राज्यातील तसेच देशातील कुक्कुटपालक व्यावसायिक हैराण आहेत. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे व्यावसायिकांना लाखो कोंबड्यांची कत्तल करावी लागत आहे. नंदूरबारमध्ये आतापर्यंत एकूण 16 पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांना या आजाराची लागण झालीये. त्यामुळे नवापूरमध्ये आतापर्यंत अडीच लाख कोबंड्यांची कत्तल पूर्ण झाली आहे. तसेच, बर्ड फ्लूचा वाढता प्रभाव लभात घेता नवापूरमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची कत्तल करण्यात येणार आहे. केली जाणार आहे.
या सर्व प्रकारामुळे येथील प्रशासनाने कुक्कुटपालन करणाऱ्यांना जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. त्याच प्रमाणे स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Comments
Loading…