in

मंत्र्यांनी केली चूक; मुख्यमंत्र्यांवर सारवासारव करण्याची नामुष्की

बिहारमध्ये एक आश्चर्यजनक प्रकार घडला आहे. मंत्रीमहोदयांच्या जागी त्यांच्या भावानंच एका शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

बिहारचे मंत्री मुकेश साहनी यांच्याऐवजी त्यांच्या भावानं एका शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर इथं एका शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला स्वत: मंत्री मुकेश साहनी हजर राहणार होते. मात्र, ऐनवेळी साहनी यांचे बंधू उपस्थित राहिले आणि त्यांनी शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली.

मंत्री मुकेश यांच्याऐवजी संतोष कुमार साहनी हे शासकीय कार्यक्रमाला हजर राहिले. याबाबत बोलताना संतोष कुमार यांनी सांगितले की, ‘माझे बंधू इतर कामात व्यस्त होते. म्हणून मी त्यांचा प्रतिनिधी या नात्यानं कार्यक्रमाला उपस्थित राहिलो’.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अनेकदा एखाद्या व्यक्तीला संपूर्ण माहिती नसते. त्यांना सर्व समजावून सांगितलं गेलं. आपली चूक झाली असल्याचं त्यांनी मान्यही केलं. अशाप्रकारे मंत्रीमहोदयांच्या जागी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं किंवा पक्षातील पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला हजेरी लावणं योग्य नाही. संतोष कुमार यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं नाही, तर याबाबत त्यांना पुरेशी माहिती नव्हती, अशी सारवासारव करण्याची नामुष्की मुख्यमंत्री नितीश कुमारांवर आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे पोलिसांचे नगरमध्ये छापे, नगर अर्बन बँकेच्या माजी संचालकांची धरपकड