in

Bihar Election|वंचित बहुजन आघाडी बिहार निवडणूक लढवणार, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

Share

देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर युतीने केली होती, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला, भविष्यात असा प्रयत्न परत करु. जे महाराष्ट्रात घडलं नाही, ते बिहारमध्ये घडवून आणू, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे, हा बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा एकमेव उद्देश आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून 40 टक्के समाज आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. शिवाय हे सरकार नागरिकता, आरक्षण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे मौलवी, मौलाना तसेच सुशिक्षित मुस्लिम बांधवांना माझे सांगणे आहे की याबाबत विचार करा, आपण सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पाडू. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

दरम्यान, आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून राज्यात एमआयएमला सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी समविचारी छोट्या छोट्या पक्षसंघटनांना सोबत घेतलं होतं. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली नव्हती. दोन्ही काँग्रेसने त्यांनी कधीही न जिंकलेल्या लोकसभेच्या 12 जागा वंचितसाठी सोडाव्यात, अशी मागणी आंबेडकरांनी त्यावेळी केली होती. त्यावर मतैक्य न झाल्याने एमआयएमला सोबत घेऊन वंचितने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र, मतांची बेगमी करण्यात ते यशस्वी झाले होते. शिवाय वंचितच्या मदतीमुळे एमआयएमचे इम्तियाज जलील औरंगाबादमधून निवडून आले होते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शिवसेनेने भाजपसोबत यावं, रामदास आठवलेंचं विधान