in

मुंबई लोकल संदर्भात सर्वात मोठी बातमी; महिलांना उद्यापासून लोकलने प्रवास करण्याची मुभा

Share

राज्य सरकारने उद्या नवरात्रीच्या मुहूर्तावर महिलांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

अनलॉक बार, रेस्टॉरंटला परवागनी दिल्यानंतर आता महिलांना लोकल मधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. उद्या नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबई आणि MMR रीजनमधील महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार आहे. महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही.

दरम्यान याआधी केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा होती. त्यात उद्यापासून सर्वसामान्य महिलांना लोकलने प्रवास करता येणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह

महिला प्रवाशांसाठी लोकलची दारे खुली; मात्र रेल्वे बोर्डाकडून अद्याप ग्रीन सिग्नल नाही…