in

दिल्लीत मोठा राजकिय भूकंप; शिरोमणी अकाली दलाची NDA तून एक्झिट

Share

दिल्लीत कृषी विधेयकावरून सुरु असलेल्या विवादावर शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी काहीच दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर काल शनिवारी रात्री शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) मधूनचं बाहेर पडला. या संदर्भात पक्षाने माहिती दिली. त्यामुळे भाजपने दुसरा मोठा पक्ष गमावला.

“कृषी विधेयकासंदर्भात ज्यावेळी केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश आणण्यात आले होते, त्यावेळीही हरसिमरत कौर यांनी अध्यादेशाला विरोध करत त्यात बदल करण्यास सुचवले होते. मात्र, त्यांचे ऐकले गेले नसल्याने त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यांनतर शिरोमणी अकाली दलाच्या काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत मोदी सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला गेला.

दरम्यान शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी ट्विटरवरून यासंदर्भात सांगितलं की, 1 ऑक्‍टोबर रोजी शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये मोठा शेतकरी मोर्चा काढेल आणि राष्ट्रपतींच्या नावाने राज्यपालांकडे निवेदन सोपवेल.

भाजपनं दुसरा जुना सहकारी गमावला

शिरोमणी अकाली दल हा भाजपचा NDA मधील सगळ्यात जुना सहकारी होता. जवळपास 22 वर्षे शिरोमणी अकाल दल भाजपसोबत NDA मध्ये होता. महाराष्ट्रातील शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलाच्या रूपात भाजपनं गेल्या वर्षभरात दुसरा मोठा मित्रपक्ष गमावला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट

भाजप नेत्या उमा भारती कोरोना पॉझिटीव्ह