in

मोठी बातमी : मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आज मराठा आरणक्षाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी करण्यात आली. सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. जर प्रत्यक्ष सुनावणीला तोपर्यंत सुरुवात झालेली नसेल तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच सुनावणी होईल  सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टात सुनावणीदरम्यान सांगितलं की, दस्तऐवजांचे खंडांच्या प्रिंट काढायच्या असून त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यानच सांगितले की,  तीन ते चार आठवड्यांनी यावर सुनावणी सुरु करु म्हणजे तोपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली असेल.

याचिकाकर्त्यांना 8, 9 आणि 10 तारखेला युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात आला असून 12, 15, 16 आणि 17 तारखेला राज्य सरकारला युक्तिवादासाठी वेळ देण्यात आलेला आहे. व 18 मार्चला काही नवे मुद्दे असल्यास त्यासंबंधी सुनावणी होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाकिस्तानमध्ये इराणचा सर्जिकल स्ट्राइक

farmers protest : ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींचा अजित पवारांनी घेतला खरपूस समाचार