in

शेतकरी आंदोलनाबाबत मोठी बातमी; कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

Share

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 49 वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची गंभीर दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेतल्यानंतर केंद्र सरकारने कोर्टात प्राथमिक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. यावेळी कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाली आहे.

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार जणांची समिती तयार केली आहे. कृषी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दणका दिला आहे.कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार जणांची समिती तयार केली आहे. कृषी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दणका दिला आहे.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेद्वारे तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारची कानउघाडणी केली. नव्या कृषी कायद्यांना तुम्ही स्थगिती द्या, अन्यथा आम्ही देऊ, अशा शब्दांत केंद्राला ठणकवताना न्यायालयाने तोडग्यासाठी समिती नेमण्याचा पुनरूच्चार केला होता. त्यानुसार, आज सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘कोविशिल्ड’च्या 56.5 लाख डोसचे आज होणार वितरण

मांसाहारी पदार्थांन मिळणार नवी ओळख