in ,

IPL 2021| IPL बाबत आज मोठा निर्णय होणार

कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे उर्वरीत सामने कधी होणार? असा प्रश्न सर्वच क्रिकेटप्रेमींना पडला आहे. या प्रश्नांचे उत्तर कदाचित आज मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज विशेष कार्यकारीणी बैठक बोलावली आहे.बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे या बैठकीचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. या बैठकीत 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयपीएलचे सामने युएईत होण्याबाबत निर्णय होऊ शकतो. तसेच वर्षाखेरीस भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकालाही कोरोनाच्या संकटामुळे परदेशात घेण्याचा निर्णय आज होऊ शकतो.

बीसीसीआयला यंदाचा टी-20 विश्वचषक भारतातच घ्यायचा आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे खेळाडूंची सुरक्षा , कोरोनाप्रतिबंधक नियम इत्यादी प्रश्न निर्माण झाल्याने आजच्या बैठकीत या सर्वांवर चर्चा केली जाणार आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, उर्वरीत आयपीएलमध्ये 17 सामन्यांसह अंतिम सामना आणि चार बाद फेरीचे सामने खेळवले जातील. 15 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान सुरु होणारी ही स्पर्धा 10 ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा’

मुनमुन दत्ताविरोधात मुंबईत गुन्हा दाखल