in

राज्य सरकारचा मोठा निर्णय; रोजगारासह पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना

Share

कोरोनाच्या महामारीमुळे यंदा पर्यटन क्षेत्र तोट्यातच गेलं असं म्हणावं लागेल. मात्र तरीही सरकार खंबीर असून,पर्यटन क्षेत्राला आलेली मरगळ झटकून काढण्यासाठी पर्यटन विभागाने नवीन प्लॅन आखला आहे. राज्याचे पर्यटन विभाग आता चौपाट्यांवर बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारणार आहेत. या बीच शॅक्सच्या माध्यमातून 80 टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.या पर्यटन विभागाने नवीन प्लॅनला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हि संकल्पना प्रत्यक्षात उतरल्यास स्थानिकांना मोठा फायदा होणार आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यात गोव्यापेक्षा उत्तम पर्यटन उभारण्याचा पर्यटन विभागाचा मानस आहे. यासाठी आठ ठिकाणी बीच शॅक्स अर्थात चौपाटी कुटी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. याठिकाणी चहा, नाश्ता, भोजन आणि मर्यादित स्वरुपात बियर देखील विकण्याची परवानगी दिली जाणार आहे. यातून कोकणातील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे.

दरम्यान रत्नागिरीतील आरे वारे आणि गुहागर येथे प्रायोगिक स्तरावर 1 सप्टेंबर 2020 पासून याची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कुणकेश्वर आणि तारकर्ली याठिकाणी अशा स्वरुपाची पर्यटन व्यवस्था राहणार आहे.

काय आहे संकल्पना?

 • राज्य सरकारच्या निर्णयानुसार एका चौपाटीवर 10 कुट्या उभारल्या जातील.
 • स्थानिकांना त्या कुट्या उभरण्यास प्राधान्य.
 • तीन वर्षांच्या मदतीसाठी त्याचा परवाना मिळणार.
 • त्यासाठी 15 हजार रुपये विना परतावा मूल्य असेल
 • या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.
 • तर परवानाधारकाला 30 हजार रुपये डिपॉझिट भरावी लागेल
 • या बीच शॅक्स 15 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल
 • या कुट्यांच्या समोर प्रशस्त बैठक व्यवस्था असेल.

या जिल्ह्यातील किनारी बीच शॅक्स?

 • रायगडमध्ये : वरसोली (ता. अलिबाग) आणि दिवेआगर (ता. श्रीवर्धन)
 • रत्नागिरी : गुहागर आणि आरेवारे
 • सिंधुदुर्ग : कुणकेश्वर, तारकर्ली
 • पालघर : केळवा आणि बोर्डी बीच

काय असतील नियम

 • चौपाटी कुटी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहतील
 • म्युझिक किंवा संगीता धांबडधिंगा नको
 • प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल
 • किनाऱ्यांच्या स्वच्छतेची दक्षता घ्यावी

या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कार जाळायच्या का? जितेंद्र आव्हाड यांचा अमिताभ बच्चन यांना सवाल…

Remembering the legendary Field Marshal #SamManekshaw on his death anniversary.

फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या पुण्यतिथिनिमित्त श्रद्धांजली म्हणून अभिनेता विक्की कौशलचा नवा लूक रिलीज