in

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; ‘या’ चाकरमान्यांना मिळणार स्थानकात प्रवेश

कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रवाशांच्या काळजी करिता महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. आज (शनिवार) पासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरु होईल. मात्र ज्या प्रवाश्यांकडे आरक्षण आहे अशाच प्रवाशांनी स्थानकात यावे,आरक्षण नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही असा कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वेने या वर्षी मोठे नियोजन केले आहे. २२५ हुन अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे कोकणी गणेश भक्तांना कोकणात आणत आहे .गणेश भक्ताच्या परतीच्या प्रवासाचे हि कोकण रेल्वेने मोठं नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होऊ नये या करिता कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात बॅरेकेटिंग करण्यात आले आहे.आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणाऱ्या प्रवाश्याची तपासणी केली जात आहे नोंद घेतली जात आहे.आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाश्यांच्या गर्दी चे नियंत्रण केले जात आहे.

आता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होईल. यावेळी केवळ आरक्षण असलेल्या प्रवाश्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार आहे. ज्याच्या कडे आरक्षण नाही अशा मंडळींनी स्थानकावर गर्दी करू नये त्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही आहे.आरक्षण असलेल्या प्रवाशांनीहि तपासणी करीता आपल्या ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Karanja ghadge

राज्यात येत्या ४,५ दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज