in ,

Big Boss Season 15 | अभिनेत्री निया शर्माची होणार तुफानी एन्ट्री…

अभिनेत्री निया शर्माने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच काही फोटो शेयर केले आहेत. या सोबत तिने या फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘चला काही तुफानी करूया, बिग बॉस ओटीटीमध्ये (BIG BOSS OTT). त्यामुळे आत्ता स्पष्ट झालं आहे, की ती वाईल्ड कार्ड एन्ट्री दुसरी कोणाची नसून निया शर्माची आहे.

बिग बॉस OTT’(Bigg Boss OTT)सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. दररोज शोमध्ये नवनवीन ट्वीस्ट (twist) पाहायला मिळतात. करण जोहरने या आठवड्यात कोणीही बाद (elimination) होणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे स्पर्धक खुपचं आनंदी झाले होते. मात्र त्याचबरोबर अजून एका गोष्टीची माहिती दिली होती. आणि ती म्हणजे वाईल्ड कार्ड एन्ट्री (wild card entry).या आठवड्यात बीबी च्या घरात (bigg boss house) कोणीतरी येणार असल्याची चाहूल करणने दिली. आत्ता या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचं नाव स्पष्ट झालं आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) शोची स्पर्धक बनून येणार आहे. करण जोहरने बिग बॉस ओटीटीमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची घोषणा केल्यापासून चाहत्यांच लक्ष वेधलं आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री निया शर्माने जमाई राजा (Jamai Raja), इश्क में मरजावन (Ishq Mein Marjawan)आणि नागिन (Nagin) यासह अनेक शोमध्ये काम केले आहे.

नियाला बिग बॉसच्या निर्मात्यांनी मागील सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी विचारले होते. मात्र, अभिनेत्रीने ऑफर स्वीकारली नाही. खरं तर, असे चाहत्यांना असे सांगितले गेले होते की, ती रिअॅलिटी शोच्या 14 व्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज होती, परंतु शेवटच्या क्षणी निवड रद्द करण्यात आली. शोचे स्वरूप पाहता तिला वादात अडकण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तिला ऑफर घेण्याची भीती होती. पण यावेळी, निर्मात्यांना अभिनेत्रीचा होकार मिळवण्यात यश आले .

आत्ता बिग बॉस OTT मध्ये निया कशा पद्धतीने चाहत्यांचं मनोरंजन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस OTT मध्ये सध्या अनेक ट्वीस्ट आणि टर्नस येत आहेत. स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात स्पर्धक जीशान खानला (Jishan Khan) घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. त्याने प्रतिक सहेजपाल (Pratik Sehajpal)आणि निशांत भट्टसोबत (Nishant Bhat)मारामारी केली होती. त्यामुळे दंड स्वरुपात त्याला घरातून बाहेर काढण्यात आलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सरन्यायाधीशांनी एकाच वेळी दिली नऊ न्यायाधीशांना शपथ

अहमदनगर जिल्ह्याला पावसाने झोडपले