in

YouTubers ना मोठा झटका…

सध्या सोशल मीडिया हे पैसे कमवण्याचे माध्यम देखील झाले आहे. पण आता भारतीय YouTubers जास्त पैसे कमावू शकणार नाहीत. गुगलने नुकतीच एक नवी घोषणा केली आहे. या घोषणे नंतर इंडियन YouTubers यापुढे व्हिडिओं मधून जास्त पैसे कमावू शकणार नाहीत. आता YouTubers त्यांच्या कमाईवर कर भरावा लागणार आहे.

सर्व यूट्युबर्सना सर्च जायंटने याबाबतची माहिती ईमेलद्वारे दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, YouTubers ना त्यांच्या व्हिडीओंच्या बदल्यात जे पैसे दिले जातात, कंपनी त्यामधून यूएस कर (US Tax)वजा करेल. यूएसबाहेरील सर्व कंटेंट क्रिएटर्सना हा नवा नियम लागू होईल. अमेरिकन YouTubersवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. हा कर जून 2021 पासून सुरू केला जाणार आहे.

गुगलच्या अधिकृत कम्यूनिकेशनमध्ये गुगलने असे म्हटले आहे की, पुढील काही आठवड्यांमध्ये आम्ही आपणास अ‍ॅडसेन्समध्ये कर भरण्याविषयी माहिती विचारू, 31 मे 2021 पर्यंत तुमच्या टॅक्सबाबतची माहिती उपलब्ध नसल्यास, Google तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईमधून 24 टक्के पैसे वजा करेल.

वापरकर्त्यांना (युजर्सना) इथे एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की या पैशांमध्ये तुम्ही जाहिरात आणि अमेरिकन युजर्सद्वारे मिळवलेल्या पैशांचादेखील समावेश असेल. तसेच या यादीमध्ये यूट्युब प्रीमियम, सुपर चॅट, सुपर स्टिकर्स आणि चॅनेल मेंबरशिप्सचादेखील समावेश असेल. कंपनीने असे म्हटले आहे की, जर तुम्ही कर दस्तऐवजात (टॅक्स डॉक्यूमेंट) संपूर्ण माहिती दिली तर तुम्हाला यूएस बाहेरील दर्शकांसाठी कर भरावा लागणार नाही किंवा त्या पैशांवर कोणताही कर आकारला जाणार नाही.

नवीन कर नियम काय आहे?

  • YouTube च्या या मेलकडे तुम्ही लक्ष दिले नाही आणि तुमची कर माहिती (टॅक्स इन्फो) सबमिट केली नाही तर तुम्हाला तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईच्या 24 टक्के रक्कम द्यावी लागेल.
  • टॅक्स इन्फो जमा केली केली आणि कराराच्या फायद्यांसाठी (ट्रिटी बेनिफिट) पात्र असाल तर तुम्हाला त्या अमेरिकन दर्शकांसाठी 15 टक्के कर भरावा लागेल ज्यांच्या मदतीने तुम्ही पैसे कमावले आहेत.
  • गुगलने एक उदाहरण देत म्हटले आहे की जर भारतातील एखादा कंटेट क्रिएटर महिन्यात 1000 डॉलर कमावतो आणि त्याने त्यापैकी 100 डॉलर्स अमेरिकन दर्शकांच्या मदतीने कमावले आहेत, तर मग त्याला त्याच्या क्रिएटरला 1000 डॉलर्सचे 24 टक्के म्हणजेच 240 डॉलर्स द्यावे लागतील.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुधीर मुनगंटीवारांच्या अडचणी वाढणार; ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी समिती गठीत

औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीची यात्रा महोत्सव रद्द