in ,

भाजपला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने केली राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा…

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा धुरळा उडाला असताना, आता भाजपला मोठा झटका बसणार आहे. भाजप नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेणार आहेत. 8 एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. भाजप आणि राष्ट्रवादीकडून विजयाची रणनीती आखली जात आहेत. याचवेळी कल्याणराव काळे यांचा भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोण आहेत कल्याण काळे?

  • कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव आहे.
  • विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले
  • भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष
  • सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक
  • श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
  • सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष
  • सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष
  • राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष
  • माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार
  • राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

What do you think?

-19 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पंतप्रधानांना पत्र

‘हलकी हलकी’ मधून अमृता खानविलकर-पुष्कर जोगच्या केमिस्ट्रीची झलक